पंतप्रधानांच्या हस्ते उरण रेल्वेला शुभारंभ
| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतिक्षेत होते. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न्हावा शिवडी अटल सेतूचे उद्घाटन झाले. त्यानंतर उलवा येथून उरण-नेरुळ रेल्वेला झेंडा दाखवून उरण येथून रेल्वे नेरुळ येथे रवाना झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, इतर मंत्री व मान्यवरांच्या उपस्थिती उरण रेल्वेचा शुभारंभ झाला.यामुळे गेली अनेक वर्षांपासून उरण रेल्वे कधी सुरू होणार या प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांनी आज रेल्वे सुरू झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. उरण रेल्वे व अटल सेतूचा फायदा आता द्रोणागिरी नोंडमधील बिल्डर लॉबी उचलतील. तसेच आता येथील उरल्यासुरल्या जमिनीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.