पेण शहराच्या भिंती झाल्या बोलक्या

| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरामध्ये मा. वसुंधरा अभियान 2023 अंतर्गत पेण शहरातील भिंतीवर तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलावर देखील उत्तम असे रंगीत छायाचित्र काढले असून, या छायाचित्रामधून पेणची संपन्नता अधोरेखीत केलेली आहे. तसेच या रंगीबीरंगी चित्रामधून स्वच्छतेचे महत्व तसेच पेण शहरामध्ये असणारा मैदान, पेण शहरामधील तलावे, क्रांतीकारी तसेच बाप्पाचे रेखीव चित्र एक ना अनेक रंगीत चित्रामुळे पेण शहरातील भिंती बोलक्या झाल्या असून यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडली आहे.

गेली दीड वर्ष पेणचा कारभार मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांच्या हातात आहे. मात्र, ज्या बाबी लोकप्रतिनिधी असताना झाली नाही त्या बाबी जीवन पाटलांनी करून दाखविले आहे. रंगीत चित्रा बाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पेण शहर हे ऐतिहासिक शहर असून माझी वसुंधरा अभियान 2023 अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत त्यातीलच हा एक उपक्रम असून या रंगीत चित्रामुळे पेण शहरातील काही पर्यटन स्थळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम यासारखे चित्र रंगवून आमच्या पर्यटकांना देखील आर्कषित करण्याचा मानस आहे.

पेण शहरात जनजागृती व्हावी म्हणून आम्ही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार स्लोगन देखील पेन्टींग केलेले आहेत. या चित्रांमुळे कळत-नकळत पेण शहराच्या संपन्नतेत वाढ झालेली आहे.- जीवन पाटील, मुख्याधिकारी

Exit mobile version