बळीराजासाठी सुखद वार्ता
। पुणे । वृत्तसंस्था ।
पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे. धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा वाढल्यास हे धरण 100 टक्के भरणार आहे. गेल्या दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने 3 दिवसांत 6 टक्के पाणी साठा वाढला आहे. यामुळे शेतकरयांमध्ये आनंदाचे, समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पुणे जिल्हयातील धरणक्षेत्रात महिनाभर पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे बळीराजासोबतच सर्वच नागरीक चिंतातुर होते. पण मागील आठवडयापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्हयातील 26 धरणांपैकी 21 धरणे 100 टक्के भरली आहेत. पुण्यातील मुठा, नीरा खोरी शंभर टक्के भरली असून कुकडी प्रकल्पातील धरणात 90 टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा जमा झाला आहे.