दिघोडे येथे ट्रेलरच्या चाकांनी घेतला पेट

। उरण । वार्ताहर ।
दिघोडे येथे ट्रेलरने अचानक पेट घेतल्याची घटना भर दुपारी घडली आहे. परंतू तेथे आसलेल्या एका रिफर यार्ड मधील अग्निशामन दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेत ट्रेलरला लागलेली आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिघोडे येथील रानसई धरणाकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला आसलेल्या आर्यन यार्ड जवळ एमएच 43, वाय 1754 या ट्रेलरच्या पाठीमागील चाकांना अचानक आग लागली. सदर आग ही कडक उन्हामुळे तापलेला रस्ता व चाकांच्या घर्षणाने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र सदर आग विझवेपर्यंत ट्रेलरची पाठीमागील सर्व टायर जळून गेले होते.

Exit mobile version