रसायनी | वार्ताहर |
नव-यासोबत राहायचे नसल्याने नवर्याला घाबरवून सोडचिठ्ठी देण्यास भाग पाडण्यासाठी पत्नीने आणि तिच्या भावाने डोक्यात दगड मारुन आणि चापटीने मारहाण करुन दुखापत केल्या प्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खाने आंबिवली येथे राहणारा निलेश कांबळे (वय 32)व त्याच्या पत्नीचे पटत नसल्याने पत्नीला त्याच्याकडून सोडचिठ्ठी हवी होती. परंतू पती सोडचिठ्ठी देण्यास तयार नव्हता.यातच खाने आंबिवली बसस्टॉपजवळ पत्नी व तिचा भाऊ हे उभे असताना तिथे निलेश आला.यावेळी त्याची पत्नी व पत्नीच्या भावाने त्याला घाबरवून सोडचिठ्ठी देण्यासाठी निलेश कांबळे याच्या डोक्यात दगड मारुन जखमी करुन चापटीने मारहाण करुन दुखापत केली.सदर प्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 323,324,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





