महिला पोलिसाचा मोबाईल फोडला

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
महिला वाहतूक पोलिसाचा मोबाईल फोडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना गायकवाड असे महिलेचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकी समोरील रस्त्यावर वाहतूक पोलिसांतर्फे नो पार्किंगमधील वाहनांना टोइंग लावून आणले जाते. आठ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास महिला पोलीस शिपाई साधना पवार ह्या सरकारी कर्तव्य करत असताना पांढर्‍या रंगाच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून एक महिला तेथे आली व त्यांनी त्यांची दुचाकी टोइंगद्वारे कारवाईसाठी आणल्याचा राग मनात धरून महिला पोलिसाचा मोबाईल फोडला व त्यांच्या कामात अडथळा निर्माण करून जोरजोरात आरडाओरडा केला. व मोबाईल फोडून त्याचे नुकसान करून त्यांच्याकडे बघून दमदाटी केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version