महिलेवर गुन्हा दाखल

। रसायनी । वार्ताहर ।
तळेगाववाडी येथील गावातील बजरंग बली मंदिराजवळ सुष्मा परशुराम ठाकूर हिने गैरकायदा तयार हातभट्टीची दारू आपल्या ताबे कब्जात बाळगले स्थितीत रसायनी पोलिसांना मिळून आली. यात रसायनी पोलिसांना एकूण 1000 किंमतीची गैरकायदा हातभट्टीची तयार दारु साधारण 25 लिटर क्षमतेची सफेद पांढर्‍या रंगाच्या प्लॅस्टिकचा कॅनमध्ये मिळून आली. रसायनी पोलिसांनी सुष्मा ठाकूर हिच्यावर महाराष्ट्र प्रो.अ‍ॅक्ट खंड 65(ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस खाड्ये तपास करीत आहेत.

Exit mobile version