घरी दळण घेऊन जात असताना महिलेला भरधाव कार ने चिरडले

58 वर्षीय महिला जागीच ठार

म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यात दिधी – पुणे या  राष्ट्रीय महामार्गावर म्हसळा तालुक्यातील वरवठणे गावा नाजिक भरधाव कारने घरी दळण घेऊन जाणाऱ्या ५८ वर्षीय महीलेला उडवल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.

 या बाबत मृत महिलेचा मुलगा विनायक जानू कोठावळे वय ३० रा. रेवली याने अपघाताची नोद म्हसळा पोलीसात दिल्याने म्हसळा पोलीसानी गु. र. नं. ६८/२०२१ भादविस. कलम ३०४(अ), २७९, मो.वा.का. कलम १८४ प्रमाणे नोंद केली. यामध्ये आरोपी किशोर भगवान पवार वय ४०, सध्या रा.प्रभात कॉलनी महाड , मूळ रा.नेवरगाव, ता.गंगापूर जि. औरंगाबाद हा आपले मालकीचे फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट कार क्रं MH03 CS 4597 या कारने दिवेआगर वरून महाडकडे भरधाव, अतिवेगाने, हयगयी ने जात असता वरवठणे कडून ईनायत कादरी यांचे फ्लोअर मील मधून दळण घेऊन आपले रेवली गावी जात असताना वनिता जानू कोठावळे या महीलेला कारचालकाने विरुद्ध साईडने येऊन उडविले, अपघातात वनिता कोठावळे यांचे हात, पाय व डोक्याला जोरदार गंभीर दुखापती होऊन भिषण अपघातात घटनास्थळी कोठावळे या मृत झाल्याचे सांगण्यात आले. वनिता कोठावळे यांचे पश्चात दोन मुलगे,सूना, नातवंडे असा परिवार आहे.

Exit mobile version