ट्रक घरात घुसून महिला जखमी

। खरोशी । वार्ताहर ।
उचेडे स्टॉप वर असलेल्या तुळशीराम म्हात्रे यांच्या घरातील उंबरठ्यापर्यंत सिमेंट गोणी ने भरलेला ट्रक घुसल्याने घराचे व जिन्याचे मोठे नुकसान झाले या अपघातात एक महिला जखमी झाली असून रस्त्यावर कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घराचे गाडीचे व एका मोटर सायकलचे नुकसान झाले आहे. पेण ते वडखळ जाणारा ट्रक बस स्टॉपवर आला असता ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. हा ट्रक घरातल्या जिन्यात अडकून राहिला म्हणून मोठा अनर्थ घडला.

Exit mobile version