। माणगाव । प्रतिनिधी ।
वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ट्रक चालकाचे प्राण वाचले आहेत हा प्रकार माणगाव येथे शनिवारी घडला. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक नंबर मुंबई गोवा महामार्गा वरुन महाड बाजू कडून मुंबईच्या दिशेने जात असताना जुने माणगाव तीनबत्ती नाका येथे ट्रक आला ट्रक चालकाला गाडी चालवत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले. व चक्कर येऊन ट्रकमध्येच बेशुद्ध पडला व ट्रक रोडच्या बाजूला जाऊन थांबला त्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला.
या वेळी त्या परिसरात असणार्या स्थानिक रहिवाशांनी ड्युटी वर असणार्या ट्राफिक पोलिसांना फोन करून माहिती दिली तेव्हा माणगाव वाहतूक शाखेचे कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार सफौ. अनिल महाडिक, पो. कॉ. लालासाहेब वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. योग्य वेळी उपचारासाठी दाखल करून पोलिसांनी आपले कर्तव्यतत्परता दाखवून दिली. व त्याची विचारपूस करून त्याच्या मालकाला फोन वरून सदर घटने बाबत माहिती दिली. आता चालकाची प्रकृती स्थिर आहे