। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव – पुणे रस्त्यावर ताम्हिणी घाटात रविवारी (दि. 1) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीला अपघात होऊन या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून माणगावच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करत असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या दुर्घटनेत पूजा मनोज गोरे (27) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर त्यांच्यासोबत असलेले मंजीत संजय शर्मा (32) हे या अपघातात जखमी झाले. या घटनेमुळे गोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.






