महिलेचे दागिने लंपास

। कोलाड । वार्ताहर ।

माणगांव येथील सविता पांडुरंग शेडगे (40) एसटी बसमध्ये माणगाव-कोलाड दरम्यानच्या प्रवास करत असताना त्यांच्याजवळील पर्स अज्ञान चोरट्याने लंपास केले. ही घटना सोमवारी (दि.13) सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास घडली. चोरीला गेलेल्या पर्समध्ये 60,000 रू कींमतीचे दिड तोळे वजनाचे सोन्याचे गंथन, 20,000 रू कींमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातलेे, 20,000 रू किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातली सोन्याची चैनु, 20,000 रू किंमतीचे 3 सोन्याच्या अंगठया एक 2 ग्रॅम वजनाची व दोन प्रत्येकी दीड ग्रॅम वजनाचीु, 20,200 रोख रक्कम, असे एकुण 1,40,200 रू रक्कमेसहित दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारत माल लंपास केला आहे.

Exit mobile version