| मंडणगड | प्रतिनिधी |
मंडणगड शहरातील साईनगर येथील अभिजित विलणकर हे दुपारच्या सुमारास कामासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करुन घरातील सुमारे 26 ग्रॅम वजण्याचे सोन्याचे दागिने व 8 हजार रोख रक्कम लंपास केली आहे. ते काम आटोपून घरी आल्यावर आपल्या घरात चोरी झालेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान, चोरी बाबतीत माहीती कळताच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबतचा पंचनामा केला असून गुन्हा नोंदविला आहे. अभिजित विलणकर यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, त्यांच्या घरातील 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 2 चैन, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची 1 चैन, 1 तोळे वजनाचा सोन्याचा गळ्यातील हार, 3 ग्रॅम वजनाचे कानातील जोड आणि 8 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.






