। आगरदांडा । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत अलिबाग विधानसभा मतदारसंघात निवडणूक 0रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत अलिबाग विधानसभा मतदारसंघात निवडणूक 07 मे रोजी शांततेत निवडणूका संपन्न झाल्या. 7 मे रोजी शांततेत निवडणूका संपन्न झाल्या. तरी देखील निवडणूक आयोगाने भरारी पथक व स्थिर पथक कार्यरत ठेवल्याने शिघ्रे चेक पोस्ट जवळ येणार्या जाणार्या गाड्यांची तपासणीचे काम सुरूच आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कुठेही आचारसंहिता भंग होवु नये व निवडणुक शांततेत व सुरळीत व्हावी या दुष्टीने भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी रायगड अलिबाग व सहा निवडणुक निर्णय अधिकारी अलिबाग यांनी भरारी पथक, आचारसंहिता पथक, स्थिर सर्वेक्षण व व्हिडिओ सर्वेक्षण पथकांची नेमवणुक केली होती. निवडणुका संपल्या तरी भरारी पथक व स्थिर पथके कायम ठेवण्यात आले असून गाड्याची तपासणी सुरूच आहे.