करंजा मच्छीमार बंदराचे काम निकृष्ट दर्जाचे; मच्छिमारांची चौकशीची मागणी

। उरण । वार्ताहर ।
मुबंईतील मच्छीमार बंदराचा ताण कमी करण्यासाठी उरण तालुक्यातील करंजा येथे 150 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या मच्छीमार बंदराचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामाच्या दर्जा बाबत मच्छीमार सोसायटी गप्प बसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करंजा येथिल मच्छीमार बांधवानी केली आहे. करंजा मच्छीमार बंदराची उभारणी गेली दोन तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर 150 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु त्यात वाढ होऊन तो 200 कोटीच्या वर गेला असल्याचे समजते. जेट्टीसाठी गेले दोन पावसाळ्यात भराव करण्यात आलेली माती वाहून गेली आहे. तसेच मातीऐवजी चिखल, दगड यांचा जास्त भराव तसेच कामाचा निकृष्ट दर्जाचे करून ठेकेदारांनी शासनाची एकप्रकारे फसवणूक केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांना याची सर्व माहिती असूनही ते याकडे डोळेझाक करीत असल्याने त्यांचे ठेकेदारांशी हातमिळवणी असल्याची चर्चा मच्छिमार बांधवांत सुरू आहे.

Exit mobile version