कर्जत स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम अंतिम टप्प्यात

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत स्थानकात फ्लॅट एकवर मुंबई दिशेकडे सरकता जिना बसविला जात आहे. कर्जत स्थानकातील फलाट दोन आणि तीन येथे पूर्वीपासून सरकता जिना असून, फलाट एकवर सरकता नव्याने सरकता जिना बसविला जात आहे. दरम्यान, मुंबई दिशेकडे बसविण्यात येत असलेला सरकता जिना हा एकाच वेळी दोन्ही बाजूंनी वापरता येईल, असा असल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल कॉर्पोरेशन यांनी आभार मानले आहेत.

मध्य रेल्वेवरील मेन लाईन वरील कर्जत हे महत्वाचे स्थानक आहे. मुंबई आणि पुणे या मार्गावरील महत्वाचे स्थानक असल्याने येथे विकास कामे सुरु आहेत. मात्र मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत असताना कर्जत स्थानकात मागील पाच वर्षात काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत.फलाट एक वर नव्याने सरकता जिना उभारण्याचे काम अंतिम टप्यात आहे.फलाट एक वर साधारणपणे पुण्याकडे जाणार्‍या मेल एक्सप्रेस गाड्या यांची वर्दळ असते.मात्र फलाट एक वर सरकता जिना उभारण्यात यावा अशी कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनची अनेक वर्षांपासून मागणी होती.त्यात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून देखील स्थानकातील विकासकामांचा पाठपुरावा रेल्वे प्रशासनाकडे सुरु होता.

आता फलाट एक वर मुंबई दिशेकडे सरकता जिना बनविण्यात येत आहे. त्या ठिकाणी आता एकावेळी उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी अशा दोन्ही स्वरूपात सरकते जिने असणार आहेत.त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असून कर्जत स्थानकातून सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल पकडण्यासाठी पादचारी पूल चढून जाण्याची कसरत कमी होणार आहे. त्याचवेळी बॅग घेऊन बाहेरचे गावी निघालेल्या प्रवाशांना देखील या सरकत्या जिन्याचा फायदा होणार आहे.या सरकत्या जाण्याचे काम अंतिम टप्प्यात असून कर्जत स्थानकातून प्रवषयी वर्गाने रेल्वे प्रशासन आणि मुंबई रेल कॉर्पोरेशन यांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version