| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील कर्जत रेल्वे स्थानकात फलाट एकवर मुंबई दिशेकडे सरकता जिना उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. कर्जत स्थानकातील हा दुसरा सरकता जिना आहे. यापूर्वीच फलाट दोनवर सरकता जिना कार्यान्वित झाला असून, कर्जत स्थानकात एकूण तीन सरकते जिने असल्याची माहिती मिळत आहे.
मध्य रेल्वेचे मेन लाईन वरील कर्जत स्थानक हे मुंबई पुणे मार्गावरील मध्यवर्ती आणि महत्वाचे स्थानक आहे. या दिवसरात्र प्रवाशांचे वर्दळ सुरु असते आणि त्यामुळे प्रवाशांचे सोयीसाठी विकासाचे अनेक विकास प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात कर्जत स्थानकात नवीन पादचारी पूल यांची निर्मिती झाली आहे.आता फलाट दोन पाठोपाठ फलाट एक वर देखील सरकता जिना उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. फलाट एक वरील मुंबई दिशेकडे असलेल्या पादचारी पुलाला जोडणारा सरकता जिना असणार आहे. त्या सरकत्या जाण्याचे काम पूर्ण झाले असून चाचण्या पूर्ण झाल्यावर प्रवाशांचे सेवेत येणार आहे.