महिलेविरोधात गुन्हा दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील भोगश्वर पाखाडी येथे गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन अल्पवयीन मुलांनी दगड मारले म्हणून व त्यांना प्रवत्त करणार्या त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 12 सप्टेंबर रोजी घडली होती. या गुन्हयाच्या तपासमध्ये महिला आरोपीला नोटीस देण्यात आली असून, अधिकचा तपास सुरू आहे. तसेच दोन्ही अल्पवयीन मुलांना बाल कल्याण समिती, पनवेल येथे हजर करण्यात आलेले आहे.
मुरूड शहरामध्ये सोशल मीडियाद्यारे हिंदू व्यापार्यांवर बहिष्कार टाकण्याबाबत ध्वनीफीत प्रसारीत झाल्यासंदर्भात एका मुस्लीम महिलेविरूद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, त्या महिलेला तपासासाठी नोटीस देऊन बोलविण्यात आलेले होते. याबाबत सायबर कक्षाच्या सहाय्याने अधिकचा तपास सुरू आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुरूड शहरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.