उरुस कमिटीची कार्यकारणी जाहीर

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठण्यातील उरुसमध्ये परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक या विविध प्रकारच्या वस्तू खरेदीसाठी येत असतात. शहरातील मुख्य मार्गावरील हजरत मिरा मोहिद्दिन सरकार चौकातील शाह हजरत मिरा मोहिद्दीन बाबा दर्ग्याच्या परिसरात साजरा करण्यात येतो. यंदाच्या उरुस उत्सवासाठी स्थापन करण्यात कमिटीमध्ये सादिक इलामी यांची अध्यक्षपदी तर झिशान सय्यद यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर या कमिटीत जोहेब कुरेशी यांची सचिवपदी व जुबेर पानसरे यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. दि. 26 व 27 एप्रिलला हा उरुस साजरा होणार असल्याची माहिती अध्यक्ष सादिक इलामी व पदाधिकार्‍यांनी दिली.

याचबरोबर जमातुल मुस्लीमीन नागोठणे समाज, नागोठणे उरुस कमिटीमध्ये गुलझार शिंदी, अखलाक पानसरे, याकूब सय्यद, इक्बाल शिंदी, काझीम पानसरे, हुसेन पठाण, समीर भिकन, अमीन मांडलेकर, सुहेल पानसरे, अशपाक पानसरे,असिफ मुल्ला, मुझफ्फार कडवेकर, फैय्याज पानसरे, पप्पू अधिकारी, इक्बाल पानसरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version