यश अँड ओम वॉरिअर्स संघ ठरला आगरी प्रीमियर लीगचा मानकरी

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
आगरी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पालीतील पंचायत समिती कार्यालयासमोरील क्रीडांगणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत यश अँड ओम वॉरिअर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या प्रीमियर लीगमध्ये दहा संघ सहभागी झाले होते. या लीगचे सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती. या लीगमध्ये अंतिम लढतीत यश अँड ओम वॉरिअर्स या संघाचे मालक राहुल ठोंबरे व मंगेश ठोंबरे यांचा संघ विजयी झाला. या संघाला तब्बल चार फूट उंचीचा आकर्षक चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या विजयाबद्दल यश अँड ओम वॉरिअर्स संघाचे सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले.

Exit mobile version