पांडवकड्यात युवक बुडाला

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेलजवळील पांडवकडा धबधब्याच्या डोहात बुडून एका 18 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मौसम रामबहादुर घर्ती (वय 18) रा,मानको मेडिकलजवळ, गोवंडी पश्‍चिम, मुंबई असे मयताचे नाव आहे.

पांडवकडा येथे मानखुर्द गोवंडी येथील शालेय मित्र गौरव लोखंडे, अखीप खान, सुरज यादव, मौसम घरती, राहील खान असे आले होते. त्यात गौरव लोखंडे व राहिल खान तसेच मौसम घरती यांनी डोहामध्ये उड्या मारल्या. त्यात गौरव व राहील असे वर येऊन मौसम घरती हा वर आला नाही. तेव्हा त्यांनी नवी मुंबई कंट्रोलला कळविले.

फायर ब्रिगेड व खारघर पोलीस यांनी पाण्यात गळ टाकून तसेच प्रत्यक्ष स्वीमर पाठवून त्याचा शोध घेतला. परंतु रात्री मृतदेह मिळून आला नाही. आज सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास फायर ब्रिगेड कर्मचार्‍यांनी सदर डोहातील खडकाखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढला.

Exit mobile version