। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील ओरियन मॉलसमोरील सेवा रस्त्याला लागून उभ्या असलेल्या वाहनाची काच फोडून रोकड व इतर महागड्या वस्तू चोरांनी पळवल्या आहेत. कॅफेचालक तरुणाचे रात्री तीन वाजता मोटारीच्या मागील दरवाजाची काच फोडून एक लाख रुपयांची रोकड आणि ओळखपत्र चोरले. या प्रकरणी सुकापूर येथील कॅफेचालकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.







