सायकल दुकानात चोरी

| पनवेल | वार्ताहर |

एका बंद सायकल दुकानाचे ग्रील लॉक तोडून व शटर कट करून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून आतील रोख रक्कम व चांदीची गणपतीची मुर्ती चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. जिग्नेश मारलेशा यांच्या पॅडल पॉवर बाईसिकल या पाटील कॉम्प्लेक्स येथील दुकानाचे ग्रील तोडून व शटर कट करून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून अडीच हजार रुपये रोख रक्कम तसेच 20 हजार रुपये किंमतीची अर्ध फुटीची गणपतीची चांदीची मुर्ती चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version