| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरानजीक मांदाटणे गावातील आंबा बागायतीतील बंद फार्महाऊसवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फार्महाऊसचे मालक ईशान यादव यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी फार्महाऊसचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील फर्निचर, कुकिंग सिस्टीम, भांडी, सिलिंग फॅन, गिझर, सीसीटीव्ही कॅमेरे यांसह मौल्यवान साहित्य लंपास केले आहे. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक व्हॅन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. चोरीचा पुढील तपास अंमलदार पी.बी. सुर्वे करत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत.
मांदाटणे येथील फार्महाऊसमध्ये चोरी
