। पनवेल । वार्ताहर ।
खारघर वसाहतीमध्ये असलेल्या आंबेमाता मंदिरात अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 5 मध्ये असलेल्या आंबेमाता मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी करून तेथील काही दागिने व इतर वस्तू चोरून नेल्या आहेत. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.