नेरळमध्ये एका रात्री पाच ठिकाणी चोरी

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ गावातील कुंभार आळी भागातील जैन मंदिर आणि त्या बाजूला असलेल्या इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली. तर याच रात्री नेरळ पोलीस ठाणे समोरील शैलेशनगर भागातील तीन बंगल्यात घरफोडीची घटना घडली आहे. नेरळ बाजारपेठ भागातील त्या बंद फ्लॅट मधून तब्बल चार लाख 72 हजाराचा ऐवज लंपास झाला आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कुंभार आळी भागातील श्री अंबा माता हॉल परिसरात असलेल्या श्री गणेश को. ऑप. हौसिंग सोसायटीमधील तळमजला प्लॅट नंबर चारमध्ये अज्ञात चोरटयांनी घराचे बंद असलेले दरवाजाची कडी कोणत्यातरी हत्याराने कापून आत प्रवेश करन कपाटातील लॉकर आणि डॉव्हरमध्ये ठेवलेले चार लाख 72 हजाराचे दागिने लंपास केले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

याच रात्री नेरळ पोलीस ठाणे समोरील देबाशिष या बंगल्याचे मालक मुंबई येथे राहतात. त्यामुळे चोरट्यांनी दरवाजाला लावलेले कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून वरचा मजल्यावर असलेले कपाट तोडून त्यातील सामान अस्तव्यस्त केले, याच बंगल्याचे परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर नेरळ बाजारपेठमधील जैन मंदिरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.

Exit mobile version