| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल महादेव इंगळे यांच्या सेक्टर 14, सिडको वसाहत, नवीन पनवेल येथील घरात चोरांनी 25 ग्राम वजनाची सोन्याची गंठण चोरून नेली. या प्रकरणी शनिवारी (दि.6) खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंगळे हे माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी असून ते सेक्टर 16, पिल्लाई कॉलेज जवळ, नवीन पनवेल येथे राहतात. त्यांच्या मालकीची सदनिका, सेक्टर 14, नवीन पनवेल येथे आहे. त्या घरात त्यांनी 25 ग्रॅम वजनाचे आईचे सोन्याचे गंठण ठेवले होते. सेक्टर 14 येथील घराचे कडी कोयंडा तुटलेले दिसले. आतमध्ये जाऊन पाहणी केली असता कपाटातील सोन्याची गंठण सापडून आली नाही.
माथेरानच्या मुख्याधिकाऱ्यांच्या घरी चोरी
