। नवीन पनवेल । वार्ताहर ।
खांदा कॉलनी, सेक्टर 8 येथील सुप्रिया कांबळे यांचे पती तुषार यांनी घरांमध्ये झुरळ झाल्यामुळे शक्ती पेस्ट कंट्रोल, वाशी येथे फोनवर बुकिंग केले होते. 29 मार्च रोजी पेस्ट कंट्रोलसाठी त्यांच्या घरी एक इसम आला. त्याने पेस्ट कंट्रोलची फवारणी केली व तो घरातून निघून गेला. त्यानंतर कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण घालण्यासाठी सुप्रिया गेल्या असता ते सापडून आले नाही. त्यामुळे पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आलेल्या इसमाने गंठण चोरी केली असावी असा संशय त्यांना आला. त्याला बोलावून घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने रोशन जगजीवन सिंग (वय 33, राहणार उत्तर प्रदेश) असे सांगितले. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात रोशन सिंग याच्याविरोधात सोन्याची गंठण चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.