। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
सुतारवाडीकडून कोलाडकडे जाणार्या टँकरने समोरून येणार्या ट्रेलरला धडक दिल्याने मोठा अपघात घडला. परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र काही काळ सदरच्या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
या बाबात सविस्तर माहिती अशी की, सुतारवाडीकडून कोलाडकडे जाणार्या मालवाहू टँकर क्र. एमएच 04 एफयू 3321 ने कोलाडकडून विळा भागाड येथे क्वाईल घेवून जाणार्या भरधाव ट्रेलर एमएच 46 बीएम 9905 ला जोरदार समोरासमोर धडक दिली. हा अपघात सुतारवाडी नजीक ढोकलेवाडी येथील वळणावर घडला आहे.