। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापुरातील चौक या गावाच्या बाजारपेठ मधील वर्षा या बियर बारमध्ये रात्री चोरी झाली आहे.चौक बाजारपेठेत वर्षा नावाचा बियर बार असून त्याला लागूनच त्याच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बारचे शटर फोडून आत प्रवेश केला, गल्ल्यात असलेली रक्कम घेऊन चोरटा पसार झाला,मात्र तेथील दारूला त्याने स्पर्श केला नाही,विशेष म्हणजे बार च्या वरच्या मजल्यावर बार मालक रहात आहेत.त्यांनाही याचा सुगावा लागला नाही.या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र पसरल्या मुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण पहावयास मिळत आहे, तर बाजारपेठ मध्ये सर्व व्यापारी व घर मालक यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आवाहन खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.