गांवठाणाला जागा देण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
। अलिबाग । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यांतील खानांव हे गांव एक नवीन शहर म्हणून उदयास येत असताना गावच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता गावासाठी आवश्यक असणारे गांवठाणचा शिल्लक नाही. खांनाव ग्रामस्थांच्या ताबा कब्जात असलेली सर्व्हे नं. 83 अ, क्षेत्र 22 हेक्टर व सर्व्ह 114, क्षेत्र 11 हेक्टर अशी एकुण 33 हेक्टर गुरूचरणाची ग्रामस्थांच्या हक्कांची जागा आहे ती जागा खानांव गांवच्या ग्रामस्थांना विस्तारीत गांवठाणासाठी देण्याची मागणी खानांव गांवठाण आणि ग्रामविकास समिती यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली असून सदरचे निवेदन तहसिलदार महसुल विशाल दौडकर यांच्याकडे दिले. निवेदन कर्त्यांनी निवेदनामध्ये पुढे अशीही मागणी केली आहे की, गावातील सुशिक्षित तरूण तरूणी यांना घरांसाठी जागेची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे गावासाठी शाळा,कॉलेज,किडांगण,तलाव,गार्डन,समाजमंदिर,पार्कीग,वयोवृध्दांसाठी विरंगुळा केंद्र, भाजी मार्केट यासाठी जागेची आवश्यकता आहे.वाढत्या शहरीकरणामुळे शेती संपत आहे.स्वयंरोजगार आणि छोटया व्यवसायांसाठी जागेची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.गावाच्या हक्कांच्या गुरूचरणाची जागा पनवेल नगरपालिका डंम्पींग ग्राऊंडसाठी वापर करण्याला ग्रामस्थांचा विरोध असल्याचे निवेदन कर्त्यांनी म्हटले आहे. अगोदर खानाव गावच्या गावठाणाचा प्रश्नमार्गी लावावा. पनवेल महानगर पालिकेस गावच्या हक्काचा भुखंड दिल्यास ग्रामस्थ अकमक पवित्रा घेवुन मैदानातील व कोर्टातील लढाई लढतील असा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
- पनवेल तालुक्यातील गावांलगतच्या सरकारी जागा अगोदर सिडकोने फुकटात लाटल्या. त्यानंतर काही जागा खाजगी बिल्डरांनी लुटल्या तर काही जागा पंतप्रधान आवास योजनेसाठी वापरण्यात आल्या.येथील आगरी कोळी,कराडी गावकरांच्या गावठाण विस्तारासाठी जागा देणे हे शासनाचे आणि जागा मागणी करणे हे गावकर्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे शासनाने प्रथम गावठाण विस्तार मंजुर करावा. – राजाराम पाटील, गावठाण अभ्यासक-सल्लागार
- शेतीला पुरक व्यवसाय म्हणुन खानाव गावचे ग्रामस्थ,गाई म्हशीच्या दुधावर संसार चालवायचे.गावातील गुरांना चरण्यासाठी हक्कांची जागा असावी.म्हणुन गुरूचरणाची जागा पुर्वी गावासाठी राखुन ठेवली जाईल. त्या जागेवर पहिला व शेवटचा हक्क हा आमच्या खानाव ग्रामस्थांचा आहे. – अध्यक्ष-खानाव गावठाण आणि ग्रामविकास समिती