पनवेलमध्ये तीन ठिकाणी चोरी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल आयटीआयमध्ये चोरी

औद्योगिक प्रशिक्षण संस्था पनवेल येथील यंत्र निगराणी कार्यशाळेमधून लोखंडी साधनसामुग्रीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील यंत्र निगराणी कार्यशाळेतील लोखंडी मांडणीवर ठेवलेले 830 रुपये किमतीचे लेथ मशीनचे एकूण 9 लोखंडी अँसेसरीज, 1,348 रुपये किमतीचे टुल अँड कटर ग्राईंडर मशीनचे एकूण 24 लोखंडी अँसेसरीज, तसेच 2,260 रुपये किमतीचे मिलिंग मशीनचे एकूण 18 लोखंडी अँसेसरीज असा एकूण 4,438 रुपये किमतीचे ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोन्याचे दागिने लंपास

पनवेल महापालिकाशेजारील लेक व्हीव विल्दीन इमारतीत राहणार्‍या नाजिया वसीम फोपलुंकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरातील दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत, त्यांच्या बेडरूम मधील कपाटाखालील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिन्यांपैकी 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे एक जोड सोन्याच्या बांगड्या, तसेच 45 हजार रुपये किमतीचे अंदाजे 1 तोळे वजनांचे डायमंडचे नक्षीकाम असलेल्या 2 सोन्यांच्या अंगठ्या चोरून नेले आहे. याप्रकरणी नाजिया फोपलुंकर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरी चोरी

इलेक्ट्रिक बाईक बनवणाच्या गोडावूनमधून बाइक बॅटरी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खान्देश्‍वर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेश चव्हाण ह्याचा इलेक्ट्रिक बाइक बनविण्याचा व्यवसाय आहे. बाइकसाठी लागणारे सुटे भाग ठेवण्यासाठी त्याने घरासमोर शेडचे छोटे गोडावून तयार केले आहे. या गोडावूनमधून बाइकची बॅटरी चोरीला गेली आहे. याविषयी खांदेश्‍वर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे लावा

पनवेल शहरातील शिवाजी नगर झोपडपट्टी ते रेल्वेस्टेशन मार्गावर रिक्षा चोरी, गाड्या फोडी, पाकीट मारी असे अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निमार्ण झालेले आहे. सदर घटना कमी व्हावी, किंवा घडू नये याकामी तसेच गुन्हेगार मिळावेत किंवा पकडले जावेत यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे, अशी मागणी तोफिक बागवान यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version