| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथे सिलेक्शन सेंटर स्पोर्ट्स या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी अकरा हजार सहाशे रुपये चोरून नेले आहेत. त्यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उलवे येथील राहुल किशोर गावंडे हे खारघर सेक्टर 21 येथील सिलेक्शन सेंटर स्पोर्ट येथे मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी अकरा हजार सहाशे रुपये चोरून नेले आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेर्याचीदेखील तोडफोड केली आहे. त्यामुळे चोरट्याचे सीसीटीवी फुटेज मिळू शकलेले नाहीत.
दुकानाचे शटर तोडून चोरी
