| पनवेल | प्रतिनिधी |
दुकानाचे शटर उचकटून टेबलावर ठेवलेले लॅपटॉप आणि मोबाईलची चोरी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.1)रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. खारघर सेक्टर 27 येथील रोहित गुगळे यांचा खारघर सेक्टर 2 येथे आर.जी. डिस्ट्रीब्युटर्स नावाचे शॉप आहे. त्यांनी शॉपमध्ये लॅपटॉप आणि मोबाईल ठेवले होते. दरम्यान, चोरट्यांनी शटर उचकटून दोन लॅपटॉप आणि तीन मोबाईल चोरून नेले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात व्यक्ती तोंडाला मास्क लावलेले दिसून आले. अधिक तपास खारघर पोलीस करीत आहेत.







