1.95 लाखांचे दागिने चोरीस
| पेण | प्रतिनिधी |
पेण पोलीस ठाणे हद्दीतील शंकरनगर येथील मॅगो होम्स इमारतीतील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 15 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 16 जानेवारी रोजी सायंकाळी 7 या कालावधीत घडली. अज्ञात इसमाने हॉलच्या गॅलरीतून स्लायडिंग खिडकी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचा माल चोरून नेला. पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.







