तहसीलदारांनी सील केलेल्या दगडखाणीत चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलच्या तहसीलदारांनी वळवली गावाजवळील अवैध दगडखाणीवर सील ठोकून कारवाई केली होती. परंतु, दगडखाण चालकांनी सील काढून दोन वाहने आणि उत्खनन केलेला मुद्देमाल चोरला. महसूल विभागाचे तलाठी राजेंद्र सावंत यांनी खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वळवली गावाजवळील दगडखाणीत हा प्रकार घडला. महसूल विभागाने दगडखान चालकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरिक्षक सोमनाथ मदने या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version