| पनवेल | वार्ताहर |
पनवेलमध्ये केंद्रीय सीमा शुल्क विभागाचे कंटेनरला लावलेले सील तोडून 51 लाख रुपयांची चोरी करण्यात आली. या प्रकरणी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोमाटणे गावाजवळील अपोलो लॉजी सोल्युशन लिमिटेड या सीमा शुल्क विभागाच्या सीएफएस गोदामात ही चोरी झाली. याबाबतची तक्रार अभिजीत पाटील यांनी नोंदवली आहे. गोदामात श्रीपदम लॉजिस्टिकच्या वाहने ये-जा करण्याच्या परवान्यात फेरफार करुन ट्रक गोदामात आणण्यात आला. सीमा शुल्क विभागाने थांबवून ठेवलेल्या कंटेनरच्या दरवाज्याचे सील तोडून संगणकांचे प्रोसेसर, शिलाई मशीन मेटल स्टॅण्ड असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.