तळोज्यात चोरांचा सुळसुळाट

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील तळोजा गावात चोरांचा सुळसुळाट झाला असून एकाच परिसरातील दोन घरात या चोरट्यांनी घरफोडी करून 95 हजार रुपयांची रोख रक्कम पळवली आहे.

तळोजा गावात तळोजा मन्नन कॉलनी येथे राहणारे शाहाबाज अब्दुल रहेमान पटेल (24) यांच्या राहत्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले 15 हजाराची रोख रक्कम चोरून नेली. तर दुसऱ्या घटनेत त्याच परिसरात राहणारे रियाज ईकबाल शेख यांच्या बंद घरात खिडकीद्वारे प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाचे कशाचेतरी साहायाने लॉक उचकटुन 80 हजार व 2 हजार रुपये किंमतीचा एच.पी. गॅस कंपनीचा दोन सिलेंडरच्या टाक्या असा एकूण 82 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version