| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जवळील नव्याने उभारण्यात आलेल्या पुष्पक नगर परिसरात झालेल्या दोन चोऱ्यांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली. त्यामध्ये अंबादास उंबरे हे त्यांच्या राहत्या घरात झोपले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या हॉलमधील खिडकीची काच सरकावून त्या वाटे घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील लोखंडी कोठीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल फोन तसेच त्यांच्या घरा शेजारी राहणारे संजय झुगे यांच्या घरातील मोबाईल फोन व रोख रक्कम असा मिळून दोन्ही घरातील 5,92,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







