चोरट्यांकडून मंदिरांमध्ये चोरी

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील करूळ आणि कुंभवडे येथील तीन मंदीरातील दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडल्या असून, रोख रक्कत आणि घंटा अशा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी, अज्ञात चोरट्यांविरूद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुंभवडे येथे एकविरा देवीचे मंदीर आहे. या मंदीरात आज सकाळी एकनाथ काशिराम राऊत हे पुजेसाठी गेले असता त्यांना मंदीरातील दानपेटी फोडलेली असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती मंदीर व्यवस्थापनासह वैभववाडी पोलीस स्थानकात दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई आणि त्यांचे कर्मचारी कुंभवडे येथे पोहोचले. तेथील पंचनामा सुरू असतानाच करूळ गावठण येथील केदारलिंग मंदीर आणि करूळ भोयडे येथील गणपती मंदीरातील दानपेटी फोडण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ऐन दिवाळीच्या धामधुमीत चोरटे पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.

Exit mobile version