। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कडाव येथील गणेगाव चिंचवली येथील श्री सद्गुरू आनंद प्रेम आश्रमाच्या गो शाळेमधून 3 गावठी जातीच्या गाईंची चोरी झाली आहे. तीन गायींची किंमत 35 हजार रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील कडाव येथील गणेगाव चिंचवली येथे श्री सद्गुरु अनंत प्रेम आश्रम आहे. या आश्रमात गोशाळा आहे. अज्ञात चोरट्यांनी आश्रमाच्या कंपाऊंडच्या तार तोडून आतमध्ये प्रवेश करून गो शाळेतील 35 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी जातीच्या गायी 22 ते दि. 23 सप्टेंबर रोजी दरम्यान पळवून नेल्या आहेत. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक शेळके हे करीत आहेत.