47 हजारांची चोरी

। पनवेल। वार्ताहर ।

दोन बहुरूपी व्यक्तींनी 28 वर्षीय तरुणाकडील 47 हजार रुपये चोरल्या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद धोत्रे हा देवदगाव येथे राहत असून तो मतमोजणी कार्यालयापासून 100 मीटर अंतरावर पनवेल महानगरपालिका नवीन इमारत, छोटा खांदा गाव रस्ता, काळसेकर कॉलेजच्या बाजूला, पनवेल या ठिकाणी मांडवात बसला होता. त्यावेळी एका व्यक्तीने त्याच्या खिशात हात घातला आणि पैसे काढत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या महिलेस पकडले असता त्यांनी त्याच्याकडील पैसे दुसऱ्या महिलेला दिल्याचे दिसले. या महिलांना पकडून कामोठे पोलिसांचे ताब्यात देण्यात आले. या महिला बहुरूपी असल्याचे पोलिसांनी चौकशी केल्यावर लक्षात आले. संजय मुळे आणि सुनील मुळे अशी दोघांची नावे आहेत.

Exit mobile version