पार्किंगमधून रिक्षाची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

गुल्फाम सगीर अहमद हैदर हे धरणा कॅम्प येथे राहत असून त्यांनी रोहिंजण येथील संदीप पाटील यांची रिक्षा (एमएच-46-एसी-3570) शिफ्टनुसार चालवण्यास घेतली. त्यांनी रिक्षा इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवली व ते घरी गेले. दुसर्‍या दिवशी इमारतीच्या पार्किंगमध्ये आले असता रिक्षा दिसली नाही. त्यांनी इतरत्र रिक्षाचा शोध घेतला, मात्र सापडली नाही. यावेळी त्यांनी तळोजा, धरणा कॅम्प, रोहिंजण, मुंब्रा व कळवा परिसरात रिक्षाचा शोध घेतला असता सापडली नाही. याबाबत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Exit mobile version