| पनवेल | वार्ताहर |
मोटरसायकल पार्क करून हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले आणि चोराने मोटरसायकल पळून नेल्याची घटना तोंडरे येथे घडली. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय सोंडकर हे धरणा कॅम्प येथे राहत असून, त्यांनी होंडा सीबी शाईन ही मोटरसायकल मित्राची तोंडरे येथे हळद असल्याने दुर्गा माता मंदिरा शेजारील मोकळ्या शेतात पार्क केली. रात्री साडेअकराच्या सुमारास ते पार्क केलेल्या मोटरसायकलच्या जवळ आले असता मोटरसायकल दिसून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र मोटरसायकल सापडली नाही.