| पनवेल | वार्ताहर |
पायी चालत जाणार्या महिलेच्या सॅक बॅगमधून 70 हजार रुपये किमतीचा आयफोन चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायली म्हात्रे या आसुडगाव येथे राहत असून, त्या पटेल ज्वेलर्स येथे नोकरी करतात. त्यांनी आयफोन सॅक बॅगमध्ये ठेवला होता. पनवेल एसटी स्टँड येथून पायी चालत गुणे हॉस्पिटलच्या जवळील भाजी मार्केटच्या रोडवर बसलेल्या महिलेकडून त्यांनी करवंदे घेतली. त्यावेळी पैसे काढून त्या महिलेला दिले आणि बॅगची चैन लावली. त्यावेळी त्यांचा मोबाईल फोन बॅगेत होता. त्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथून पायी चालत जात पटेल ज्वेलर्स येथे आल्या आणि बॅगेत ठेवलेला मोबाईल घेण्यासाठी गेल्या असता बॅगची चैन उघडी होती आणि बॅगेत मोबाईल नव्हता.