। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील पुष्पक नगर दापोली येथील प्लॉट नं 277 या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपये किमतीच्या बांधकामाचे साहित्य चोरून नेले. यात 51 हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप तसेच 30 हजार रुपये किमतीचे 1 टन वजनाच्या गोल रिंग असा मिळून जवळपास 81 हजार किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.






