| पनवेल । वार्ताहर ।
ट्रकमध्ये ठेवलेल्या एचपी कंपनीच्या आठ गॅस सिलेंडरची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना पनवेल शहरात घडली. कृष्णकुमार शिवसहाय सिंह (वय 45) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक क्र.एम एच 04 एएफ 2099 हा पनवेल बस स्थानक शेजारी मंदिराजवळ उभा करून ठेवला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने ट्रकमधील एचपी कंपनीचे आठ गॅस सिलेंडर चोरुन नेले. याबाबत ट्रक चालकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.