| पनवेल | वार्ताहर |
होंडा कंपनीच्या लाल रंगाच्या जेनरेटरची चोरी झाल्याची घटना शहरातील जुने ठाणे नाका परिसरातून घडली आहे. धीरूभाई लिंबानी यांच्या धीरूभाई इंटरप्रायझेस शॉप नंबर 19 सेलकम सोसायटी, जुने ठाणे नाका येथे ठेवलेला 75 हजारांचा लाल रंगाचा जेनरेटर कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.