सोन्याच्या बांगड्यांची चोरी

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

घरातून दोन तोळ्याच्या सोन्याच्या चार बांगड्यांची चोरी झाल्याची घटना 8 एप्रिल रोजी बालाजी सिम्फनी, सुकापुर येथे घडली. या प्रकरणी 12 एप्रिल रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार यांची मैत्रीण शितल कश्यप या त्यांच्या घरी सुकापुर येथे आले असताना तक्रारदार त्यांच्या मुलीला स्कूल व्हॅनमध्ये बसवण्यासाठी घराच्या बाहेर गेल्या. त्या घरी परत आल्यानंतर 9 एप्रिल रोजी बेडरूम मध्ये ठेवलेल्या तिजोरीच्या ड्रॉवरमध्ये पाहिले त्यावेळेस चावी तशीच होती आणि सोन्याच्या बांगड्या नव्हत्या. त्यांनी बांगड्यांचा घरात शोध घेतला, मात्र बांगड्या सापडल्या नाहीत.

Exit mobile version