| रसायनी | वार्ताहर |
रसायनीतील जाताडे येथील एका घरातून पाच तोळ्याच्या सोन्याच्या गंठणाची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जाताडे येथे राहणारे लडकू मेढेकर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानाच्या मागील दरवाजास चोरट्याने व्होल पाडून आतील कडी उघडली. त्यानंतर आत प्रवेश करून बेडरूमच्या लोखंडी कपाटातील तिजोरीमधील गंठण लंपास केले. याप्रकरणी लडकू मेढेकर यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.